दिवसभर कितीही धावपळ असू दे पण 'मॉर्निंग वॉक' हा प्रत्येकानेच केला पाहिजे.
शरीराचं आरोग्य राखायचं असेल तर प्रथम शरीराला चांगल्या गोष्टींची सवय करणं गरजेचं आहे.
सकस आहार, योग्य व्यायाम आणि पद्धतशीर जीवनशैली यामुळे शरीर निरोगी राहतं.
दिवसभर कितीही धावपळ असू दे पण 'मॉर्निंग वॉक' हा प्रत्येकानेच केला पाहिजे. कारण, त्याचे शरीरासाठी खूप फायदे आहेत.
मॉर्निंग वॉक केल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. नैराश्य, चिंता, ताण यांसारख्या गोष्टी दूर ठेवण्यास मदत मिळते.
रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही किमान अर्धा तास चाललात तर मानसिक आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते.
बऱ्याचदा स्ट्रेसमुळे रात्री झोप लागत नाही. मात्र, सकाळी उपाशीपोटी चालल्यामुळे रात्री झोप लागण्यास मदत मिळते.
सध्या बऱ्याच महिलांमध्ये कमी वयात मोनोपॉजची लक्षण दिसून येत आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉक करा. यामुळे मोनोपॉझनंतर येणारा थकवा, उदासीनता, तणाव दूर होतात.