सूर्यास्तापूर्वी जेवणाचे आहेत मोठे फायदे!

अनेक बॉलिवूड कलाकार हे सूर्यास्तापूर्वी जेवण करतात.

अनेक बॉलिवूड कलाकार उदा. अक्षय कुमार, करीना कपूर खान, मलायका अरोरा, नागार्जुन, अनुष्का शर्मा आणि मनोज बाजपेयी हे सूर्यास्तापूर्वी जेवण करतात.

संशोधनानुसार, शरीरातील  सर्केडियन रिदम दिवसा सक्रीय आणि रात्री विश्रांतीसाठी तयार असते.

सूर्यास्तापूर्वी जेवण घेतल्याने, इन्सुलिन संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे अन्नातील साखर शरीरावर ताण न देता पचते, रात्री उशिरा खाल्ल्यास ते चरबी स्वरूपात साठू शकते.

२०२३ मधील एका अभ्यासात आढळले की, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतच जेवण केल्याने बीएमआय (BMI) कमी होणे आणि लिपिड प्रोफाइलमध्ये सुधारणा दिसून आली आहे.

सर्केडियन टाइमिंगनुसार जेवण घेतल्यास चयापचय सुधारतो, झोप आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

खाण्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या वेळा लक्षात ठेवा तसेच हे अंतर हळूहळू कमी करा.

जेवण आणि नाष्टा यात किमान १२ तासांचे अंतर ठेवून नंतर ते १०-८ तासांपर्यंत करू शकता.

सकाळचा नाष्टा वगळू नका, उशिरा भूख लागल्यास रात्रीच्यावेळी जास्त खाल्ले जाते.

Click Here