आहारात करा तळलेल्या लसणाचा समावेश, अनेक शारीरिक समस्या होतील दूर

पदार्थाची चव वाढवणारा लसूण शरीरासाठीही तितकाच गुणकारी आहे. 

एखाद्या पदार्थाला खमंग फोडणी द्यायची असेल तर त्यात लसूण नक्कीच लागतो.

पदार्थाची चव वाढवणारा लसूण शरीरासाठीही तितकाच गुणकारी आहे. म्हणूनच, तळलेला लसूण खाण्याचे काही फायदे पाहुयात.

तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

खराब कोलेस्ट्रॉलदेखील कमी करण्यास तळलेला लसूण उपयोगी पडतो.

लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. 

लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. 

पचनक्रियेच्या तक्रारी असतील तर खा सीताफळ

Click Here