खजूर हे श्रीमंतांचे खाद्य, पण ही श्रीमंती केवळ पैशांची नाही तर आरोग्याचीही आहे. तुम्हीदेखील खजूर खा, हुजूर व्हा; वाचा फायदे!
सुका मेवा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काजू, बदाम येतात, पण खजूर हा सुद्धा सुका मेव्याचा पदार्थ आहे आणि तो अत्यंत गुणकारी आहे.
अलीकडे साखर, गूळ विरहित पदार्थाचे रिल्स बघाल तर लक्षात येईल, की लोक पदार्थात गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर करत आहेत.
दिवसभरात किती खजूर खाल्ले पाहिजे आणि त्याचे लाभ कोणकोणते ते जाणून घ्या.
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. पोट बराच काळ भरलेलं राहतं.
अंशपोटी खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. चयापचय शक्ती वाढते आणि पचन चांगले होते.
खजूर हृदयासाठी चांगले, मात्र रोज खजूर खाणाऱ्यांनी दिवसभरात २ खजूर खावेत आणि आठवड्यातून एक दोनदा खाणाऱ्यांनी दिवसाला ४ खजूर खावेत.
खजुरामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत मिळते. मात्र त्यासाठी रात्रभर भिजवलेले खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.
खजूर सेवनाने हाडे मजबूत होतात. हाडांना पोषक घटक खजुरातून मिळतात शिवाय शरीरालाही आवश्यक ऊर्जा मिळते.
खजूर खाण्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, त्याचप्रमाणे रक्ताची कमतरता दूर होते.
खजूर सेवनामुळे पुरूष आणि महिलांची लैंगिक क्षमता वाढते. बाळासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही रोज दोन खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.
खजुराचे सेवन हे मेंदुसाठी फायदेशीर ठरते. म्हणून लहान मुलांना कोरडा खाऊ म्हणून अक्रोड, बदाम याबरोबर २ खजूर द्यावेत.
सुंदर त्वचा आणि लांबसडक केसांसाठीही खजुराचे सेवन लाभदायी ठरते.
त्यामुळे प्रक्रिया केलेली प्रोटीन पावडर तसेच एनर्जी बूस्टर वापरण्यापेक्षा नैसर्गिक पोषणमूल्य देणाऱ्या खजुराचे सेवन करा.
सदर माहिती सामान्य गृहीतकाच्या आधारे केली आहे, आपल्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.
Your Page!