कापूर आहे बहुगुणी, 'या' शारीरिक समस्या होतील झटक्यात दूर
कापूर फक्त पुजेपूरताच मर्यादित नसून त्याचे काही गुणकारी फायदेही आहेत.
पूजेच्या साहित्यात महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे कापूर.
कापूर फक्त पुजेपूरताच मर्यादित नसून त्याचे काही गुणकारी फायदेही आहेत.
मानसिक ताण जाणवत असेल तर घरात कापूर लावा. कापराच्या वासामुळे मनावरील ताण हलका होण्यास मदत मिळते.
डोकं दुखत असेल तर कापूर एका रुमालात बांधून त्याचा वास घ्यावा.
अंगदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, मोहरीच्या तेलात कापूर टाकून या तेलाने मालिश करा.
डोकेदुखीचा त्रास झाल्यास कापूर, शुंथी, अर्जुन वृक्षाची साल आणि पांढरं चंदन समप्रमाणात बारीक करून कपाळावर लावावं. थोडा वेळ तसंच पडून रहावं. या उपायानं तुम्हाला भरपूर आराम मिळेल.
खोकला झाल्यास तिळाच्या तेलात कापूर मिक्स करुन छातीला व पाठीला मालिश करा.