कापूर ज्याप्रमाणे धार्मिक कार्यात वापरला जातो. त्याचप्रमाणे त्याचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत.
देवपूजेमध्ये कापूराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करुन लावल्यास केसगळती थांबते.
खोकला झाल्यास मोहरीच्या किंवा खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करुन हे मिश्रण छाती आणि पाठीवर हलक्या हाताने लावा.
पायात गोळे येणे, स्नायू दुखणे यांसारख्या समस्या असल्यास कापूर, खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात मिक्स करुन लावा. लवकर आराम मिळतो.
डोकं दुखत असल्यास कापूराच्या वडीचा वास घ्यावा. यामुळे डोकेदुखी बरी होण्यास मदत मिळते.