रक्तदान केल्याने शरीराला होतात अनेक फायदे
'रक्तदान श्रेष्ठदान' असं कायमच म्हटलं जातं. इतकंच नाही तर, रक्तदान करण्यासाठी अनेक शिबीरेही राबवली जातात.
रक्तदान केल्यामुळे केवळ एका व्यक्तीचं आयुष्यच वाचत नाही. तर, त्याच्यामुळे तुमच्या शरीरालाही अनेक फायदे मिळतात.
ज्या रुग्णांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यांनी आवर्जुन रक्तदान करावं. यामुळे रक्तातील अतिरिक्त लोहाचं प्रमाण नियंत्रणात येतं.
रक्तदान केल्याने पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.
रक्तदान केल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होते.