सध्याच्या काळात लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही.
सध्याच्या काळात प्रत्येक जण सतत धावपळ करतांना दिसतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही.
अनेकदा अपुरी झोप, कामाचा ताण, अनहेल्दी खाणं यामुळे अपचन, गॅसेस यांसारख्या समस्या निर्माण होतात.
आज आपण केळी खाण्याचे फायदे पाहुयात. ज्यामुळे अपचनासारख्या समस्या दूर होतील.
केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात.ज्यामुळे आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर होतात.
पिकलेली केळी खाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
केळ्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
केळींमध्ये असलेल्या पोटॅशिअममुळे रक्तदाब आणि हृदय नियंत्रित ठेवण्यास मदत होते.