जेवायची वेळ टाळताय? मग शारीरिक व्याधींना तुम्ही देताय आमंत्रण
धावपळीच्या जीवनात अनेक जणांना वेळेवर जेवायलाही मिळत नाही. किंवा, कामाचा लोड असल्यामुळे भूक लागल्यानंतरही जेवता येत नाही.
भूक लागल्यानंतर जर आपण जेवत नसू किंवा जेवणाच्या वेळा पाळत नसू तर त्याचे शऱीरावर कसे दुष्परिणाम होतात ते पाहुयात.
बराच काळ उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा येतो. परिणामी, डोळ्यासमोर अंधार येणे, चक्कर येणे या समस्या जाणवतात.
भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो.
भूक लागल्यावर वेळेवर न जेवल्यास किंवा अवेळी जेवल्यास लठ्ठपणा वाढतो. वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.
ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.
भूक लागल्यानंतरही न जेवल्यास चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो.
गुलाबी थंडी! कोल्हापुरातील या ठिकाणांना नक्की भेटी द्या