अनेक पुरुषांच्या दाढीचे केस अकाली पांढरे झाल्यामुळे त्याचा परिणाम हा एकंदरीत लूकवर होतो.
डोक्यावरील केस पांढरे झाले तर अनेक उपाय करुन ते काळे करता येतात. परंतु, दाढीचे केस पांढरे झाले तर? सध्या अनेक पुरुषांमध्ये हीच एक समस्या आहे.
अनेक पुरुषांच्या दाढीचे केस अकाली पांढरे झाल्यामुळे त्याचा परिणाम हा एकंदरीत लूकवर होतो. म्हणूनच, दाढीचे पांढरे केस घरगुती उपायांनी काळे कसे करायचे ते पाहुयात.
स्मॅश केलेला १ बटाटा, ४-५ पुदिन्याची पाने, १चमचा तूरडाळीचं पीठ आणि २-३ चमचे कांद्याचा रस हे साहित्य मिक्स करुन त्याचा पॅक तयार करा. हा पॅक अर्धा तास दाढीला वून ठेवा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा.
दाढीचा काळेपणा टिकवायचा असेल तर रोज १५ मिनिटे लोणी दाढीला चोळा व त्यानंतर गार पाण्याने दाढी धुवून घ्या.
गुलाब पाण्यामध्ये तुरटीची पावडर मिक्स करा. हा तयार स्प्रे दररोज झोपण्यापूर्वी दाढीवर मारा.
कोरफडीचा रस सुद्धा तुम्ही दाढीला लावू शकता. यासाठी कोरफड जेलमध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि दाढीला लावा. २० मिनिटानंतर दाढी धुवून टाका.