तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर करून कुणी चोरट्याने कर्ज काढलं असेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
हल्ली पॅनकार्डच्या साहाय्याने होणारी आर्थिक फसवणूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चोरटे सामान्य लोकांची कागदपत्रे वापरून आपला फायदा घेतात.
पॅनकार्डचा गैरवापर करून चोरट्याने कर्ज काढलं असेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. हे कर्ज तुम्हाला फेडावं लागू शकते. असा गैरवापर झाल्याचा संशय असेल तर याचा सहजपणे शोध घेता येतो.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर जारी करणाऱ्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला गेट यूवर सिबिल स्कोअर हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करताच सबस्क्रिप्शनचा पर्याय येईल.
तो स्किप करा. जर तुम्ही वेबसाइटचा पहिल्यांदा वापर करत असाल, तर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी ही माहिती द्यावी लागेल.
नंतर लॉगिन करा. त्यानंतर पॅन नंबर टाका आणि क्रेडिट स्कोअर चेक करा. त्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नंबर टाका.
शेवटी, तुम्हाला स्क्रीनवर सिबिल स्कोर दिसेल. यासोबतच लोन या विभागात जाऊन तुमच्या नावे किती कर्ज आहे, हे तपासता येते.