मराठी अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो!
हॅरी पॉटरचे चाहते जगभरात आहेत.
आजही 'हॅरी पॉटर' या चित्रपटांची सीरिज लोक आवडीनं बघतात.
नुकतंच प्रसिद्ध 'हॅरी पॉटर' या चित्रपटांच्या सेटवर लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर ही पती अभिजीत खांडेकरसह पोहचली.
सुखदानं इन्स्टाग्रामवर 'हॅरी पॉटर' या चित्रपटांच्या सेटवरील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर तिनं पोस्ट केलेल्या फोटोमधून तिचं हॅरी पॉटरविषयीचं प्रेम स्पष्टपणे दिसतंय.
या फोटोंमध्ये 'हॅरी पॉटर या चित्रपटांमधील काही आयकॉनिक भाग जसे की ग्रेट हॉल, डंबलडोरचं ऑफिस,पाहायला मिळालेत.
या फोटोत हॉगवर्ट्स एक्सप्रेस पाहायला मिळतेय.
तर या फोटोत पायऱ्याखालीची छोटी खोली दिसतेय. जिथे हॅरी पॉटर राहायचा.
तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
तिचे हे फोटो पाहून हॅरी पॉटरचे चाहते खूश झाले आहेत. हॅरी पॉटर चाहत्यांसाठी ही खास treat ठरली आहे.