IND vs PAK : सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्या टॉपला 

एक नजर खास रेकॉर्ड्सवर...

भारत-पाक टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आघाडीच्या ५ मध्ये ३ भारतीयांचा समावेश आहे. 

ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने पाकिस्तानविरुद्ध खास छाप सोडली असून दोन्ही संघाकडून त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

हार्दिक पांड्या आपला पाकिस्तानविरुद्धचा विक्रम आणखी भक्कम करण्यासाठी मैदानात उतरेल. 

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध ९ टी-२० सामन्यात १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ७ सामन्यात त्याने ११ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. 

पाकिस्तानच्या उमर गुलनं भारताविरुद्ध ६ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने एकदा चार विकेट्सचा डावही साधळा आहे. 

जसप्रीत बुमराहच्या नावे पाकिस्तानविरुद्ध ७ सामन्यात ९ विकेट्सची नोंद आहे. 

हॅरिस रौफ याने भारतीय संघाविरुद्ध ७ टी-२० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

Click Here