...अन् पांड्यानं मारला 'फिफ्टी प्लस'चा विक्रमी 'चौकार'

एकाच डावात तिघांना धोबीपछाड

हार्दिक पांड्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कडक फलंदाजी करत दमदार अर्धशतक झळकावले. 

भारताच्या डावातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. 

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर तो सामनावीर ठरला. टी-२० वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा तो सामन्याचा हिरो ठरला.

या अर्धशतकासह पांड्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा बॅटर ठरला 

हार्दिक पांड्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत चौथ्यांदा ही कामगिरी करून दाखवली आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलरनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना ३ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस यानेही टी-२० वर्ल्ड कपमध्ये तीन वेळा अशी कामगिरी नोंदवल्याचा रेकॉर्ड आहे.

या यादीत पाकिस्तानच्या शोएब मिलकचाही समावेश आहे. त्यानेही तीन वेळा अशी कामगिरी करुनदाखवली आहे.

Click Here