फोटो बघून ओळखलं का ही अभिनेत्री कोण?

आज सुपरस्टार, २४० कोटींची आहे मालकीण

या गोंडस मुलीचा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडलाच असेल ही नक्की कोण आहे. 

ही सुंदर मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्री कतरिना कैफ आहे. 

आज कतरिनाचा वाढदिवस आहे आणि या खास दिनानिमित्त तिच्या बालपणीचे काही दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

 लहानपणापासूनच तिच्या व्यक्तिमत्त्वात एक खास आकर्षण होतं, जे तिच्या प्रत्येक फोटोतून उमटतं.

 कतरिना आज १६ जुलै रोजी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

 तिच्या आयुष्यातील या खास दिवशी चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. 

विदेशातून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफची एकूण संपत्ती सुमारे २४० कोटी रुपये आहे.

विकी कौशलशी लग्न केल्यानंतर तिनं मोजकेच सिनेमे केले आहेत. पण तिची लोकप्रियता कसूभरही कमी झालेली नाही. 

Click Here