पाण्यात जास्त वेळ हात असेल, तर बाेटांना सुरकुत्या पडतात, याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल ना? पण हे असं का हाेतं, हे माहिती आहे का?
जास्त वेळ पाण्यात राहिल्यावर, पायाच्या आणि हाताच्या बाेटांना सुरकुत्या पडतात. अन्य अवयवांवर अशा प्रकारच्या सुरकुत्या पडत नाहीत.
आधी शास्त्रज्ञांचा अंदाज हाेता की, फक्त पाणी त्वचेत शाेषले जात असल्यामुळे बाेटांना सुरकुत्या पडतात. पण, प्रत्यक्षात कारण वेगळे आहे.
हाताच्या आणि पायाच्या बाेटांची त्वचा जाड असते. नखांभाेवती घट्ट असलेली त्वचा जाेडलेली असते.
जास्त वेळ पाण्यात बाेट राहिल्यावर मेंदू त्वचेखालील रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्याचा सिग्नल देतात. त्यामुळे आपल्या हाताला सुरकुत्या पडतात.
सुरकुत्या या आपल्या शरीराची ऍक्टिव्ह रिऍक्शन आहे, फक्त पाण्याचा परिणाम नसताे.
सुरकुत्या म्हणजे निसर्गाने दिलेलं ऍडव्हांटेज आहेत. हात ओले असताना पकड चांगली राहण्यासाठी हा बदल घडताे.
प्रयाेगात असे दिसून आले की, सुरकुतलेली बाेटं असताना माणसं ओल्या वस्तू जास्त घट्ट पकडू शकतात.
जर नर्व्हस सिस्टीम नीट काम करत नसेल तर बोटं पाण्यात सुरकुतत नाहीत. म्हणून कधी कधी डॉक्टर याचा उपयोग चाचणीत करतात.