केसातील कोंड्याने त्रस्त झालात? करुन बघा हे घरगुती उपाय
केसात वारंवार कोंडा होत असेल तर ही समस्या दूर करण्याचे घरगुती उपाय पाहुयात.
ऋतु बदलला की अनेकांना केसांविषयीच्या समस्या जाणवू लागतात. यात खासकरुन हिवाळ्यात केसांत कोंडा होणे किंवा डोक्याला खाज सुटणे ही कॉमन तक्रार झाली आहे.
जर तुमच्याही केसात वारंवार कोंडा होत असेल तर ही समस्या दूर करण्याचे घरगुती उपाय पाहुयात.
अर्धी वाटी दह्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांशी (Scalp) लावा आणि २०-३० मिनिटांनी केस धुवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड कोंडा साफ करण्यास मदत करते.
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या. ते पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा. कडुलिंबातील 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म केसांमधील संसर्ग कमी करतात.
दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून टाळूवर लावा. त्यानंतर ३० मिनिटांनी केस धुवा.
कोंडा जास्त असताना खूप जास्त तेल लावू नका. तेल लावल्याने 'मलासेझिया' (Malassezia) नावाची बुरशी वाढते, ज्यामुळे कोंडा आणखी वाढतो.
दुसऱ्याची फणी किंवा टॉवेल वापरल्याने कोंडा पसरू शकतो. आपली फणी दर आठवड्याला गरम पाण्याने स्वच्छ करा.
उन्हात गेल्यावर लगेच डोकं दुखतं? हे आहे त्यामागचं कारण