दिवसभर केस बांधून ठेवताय? 

केस बांधून ठेवतांना घ्या ही काळजी

स्वयंपाक घरात काम करतांना अनेक स्त्रियांना केस बांधून ठेवायची सवय असते. ही सवय काम करतांना कितीही सोयीची वाटत असली तरीदेखील तिचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.

केस घट्ट बांधून ठेवल्यामुळे त्याचा विपरित परिणाम स्काल्प आणि केसांच्या आरोग्यावर होतो.म्हणूनच, केस बांधून ठेवतांना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

केस कधीही साध्या रबरने बांधू नका. त्याऐवजी सॅटिनची रिबीन किंवा कापडी रुमालाने बांधा. केस कधीही घट्ट बांधू नका. यामुळे केसांच्या मुळांवर ताण येतो आणि केस तुटतात.

केसांचा भांग कधीही एकाच दिशेने पाडू नका. वरचेवर त्याच्यात बदल करा. नाही तर, एकाच ठिकाणी भांग पाडल्यामुळे त्या ठिकाणचे केस विरळ होतात.

केसांना एक दिवसाआड तेल लावा. ज्यामुळे त्याचे टोक कोरडे पडणार नाहीत.

ओले केस लगेच बांधू नका. तसंच दिवसातून एकवेळ तरी केस थोड्या वेळासाठी मोकळे ठेवा.

पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा तुरटी

Click Here