फटाक्यांमुळे केसांवरही विपरित परिणाम होतो.
दिवाळी असल्यामुळे सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी होत आहे.
फटाके उडवायला जितकी मज्जा येते. तितकेच ते शरीरासाठी घातकही आहेत.
फटाक्याच्या धुरामुळे श्वसनाचे आजार किंवा रात्र होतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, फटाक्यांमुळे केसांवरही विपरित परिणाम होतो.
फटाक्यांचा धूर केसात गेल्यामुळे डोक्याला खाज येणे, केस गळणे या समस्या निर्माण होतात.
फटाक्याच्या धुरामुळे केस निस्तेज होतात. तसंच ते कोरडे व्हायला लागतात.
फटाके फोडून झाल्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यावेळी सौम्य शॅम्पूचा वापर करावा.
दही, कोरफड आणि नारळाचं तेल यांच्यापासून तयार केलेला हेअर मास्क केसांना १० मिनिटे लावून ठेवावा.