गुरुपौर्णिमा गुरुचरित्र पठण:१० नियम पाळा

गुरुपौर्णिमेनिमित्त आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते.

गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींच्या चमत्कृतिपूर्ण लीलांचे वर्णन रसाळपणे केले आहे. 

गुरुचरित्राचे वाचन करण्यापूर्वी शुचिर्भूत होऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे आणि संकल्प सोडा

कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

वाचन करण्यापूर्वी शक्य असल्यास भस्म लावावे.

वाचनापूर्वी १०८ वेळा गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा.

एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे.

वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचनात यांत्रिकपणा नको.

वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मध्येच कुणाशीही बोलू नये. मनोभावे वाचन करावे.

पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा. खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी.

पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न कटाक्षाने टाळावे. एकभूक्त राहावे. सायंकाळी दूध प्यावे.

समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे. 

रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये. पोथीला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा. 

Click Here