पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा कोथिंबीर महाग होते. अशावेळी तुम्ही घरच्या घरी कोथिंबीर उगवू शकता.
हिरवीगार कोथिंबीर आपल्या भाजी, कोशिंबीर, डाळ या रोजच्या जेवणाचा एक भाग आहे. कोथिंबीरीमुळे पदार्थांची चव वाढते.
कोथिंबीर खाल्ल्याने दृष्टी सुधारते. शिवाय कोथिंबीरमध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत.
यासाठी आधी सुके धणे दोन भाग होतील, असे कुटून घ्या. कारण धण्यातूनची कोथिंबीर उगवते.
आता एका आडव्या कुंडीत माती व्यवस्थित पसरून घ्या आणि त्यात थोडे जैविक खत, पाणी घालून माती ओलसर करून घ्या.
या मातीवर आता धणे पसरा आणि वरून पुन्हा माती पसरून त्यावर थोडे पाणी घाला. माती सैलसरच ठेवा.
कोथिंबीरची कुंडी हलका सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. या रोपाला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही.
रोपाला दररोज थोडे थोडे पाणी द्या. कुंडीत जास्त पाणी ओतू नका, नाहीतर कोथिंबीर कुजेल.
२०-२५ दिवसांनी कोथिंबीरची पाने दिसू लागतील. त्यानंतर, कोथिंबीर वाढेल.
कोथिंबीर पूर्णपणे वाढल्यानंतर जितकी गरज असेल तितकीच कापून घ्या. रोप मुळापासून उपटून टाकू नका.