IPO मधून कंपन्यांनीच कमावले ४५ हजार कोटी

कंपन्यांनी इतकी कमाई केली असेल तर गुंतवणूकदारांची किती कमाई झाली असेल, जाणून घ्या. आता आणखी आयपीओ येणार आहेत.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारात आलेले अडथळे, युद्ध आणि आर्थिक चिंता कायम असतानाही कंपन्यांनी २०२५ च्या पहिल्या सहामाहीत आयपीओंच्या माध्यमातून ४५,३५० कोटी रुपये उभारलेत. 

ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी अधिक आहे. २०२४च्या याच कालावधीत ३६ आयपीओ आले. यंदा ते २४ आहेत. 

विदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत असले तरी भारतीय गुंतवणूकदार बाजारात सतत पैसे ओतत आहेत. गुंतवणूकदारांची मानसिकता सकारात्मक झाली आहे.

पुढील सहा महिन्यांत टीएससी इंडिया, इंडियाक्युब स्पेस, फॅबइंडिया, ओयो, बोट, बजाज एनर्जी, स्नॅपडील, झेप्टो, फोनपे, टाटा कॅपिटल, रिलायन्स जिओ असे अनेक आयपीओ येणार आहेत.

आर्थिक आव्हानांमुळे बाजाराची मानसिकता प्रभावित झाली. तरीही कंपन्यांनी आयपीओद्वारे ४५,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारली आहे

या कालावधीत गुंतवणूकदारांना सरासरी २५ टक्क्यांचा परतावा मिळालाय. (हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान

Click Here