केसांचा रंग पांढरा का हाेताे?

केसांचा रंग आणि वय यांचा संबंध जाेडला जाताे. पण, खरंच केस पांढरे कशामुळे हाेतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

आपल्या शरीरातील एका प्रक्रियेशी केसांचा रंगाचा संबंध जाेडलेला आहे. यामुळे काेणत्या वयात केस पांढरे हाेतील हे सांगता येत नाही. 

केसांचा रंग मेलानिन अवलंबून असतो. जास्त मेलानिन असेल तर केस काळे दिसतात. कमी मेलानिन असेल तर तपकिरी किंवा पांढरे केस दिसतात. 

वय वाढत जातं, तसं शरीरात मेलानिन करणाऱ्या पेशी कमी काम करतात. त्यामुळे केसांचा रंग बदलताे.

केसांचा रंग जनुकांवर अवलंबून असताे. आई - वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील, तर मुलांचे केस लवकर पांढरे हाेऊ शकतात. 

जास्त तणाव, झोपेचा अभाव, धूम्रपान, चुकीचा आहार यामुळे केस लवकर पांढरे होतात.

व्हिटॅमिन B12, लोह, झिंक यांची कमतरता असेल तर केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे ही केस पांढरे हाेतात. 

काही आजार किंवा औषधांचे साईड इफेक्ट्समुळे केस पांढरे हाेण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात. 

प्रदूषण, केमिकलयुक्त शॅम्पू, जास्त सूर्यप्रकाश यामुळे केसांचे नैसर्गिक संरक्षण कमी हाेते. त्यामुळेही केस पांढरे हाेतात. 

केमिकल्सचा कमी वापर, संतुलित आहार, तणाव कमी यामुळे केस पांढरे हाेण्याचे प्रमाण कमी हाेऊ शकते.

Click Here