नियम फॉलो केले तर नक्कीच हेल्दी लाइफ जगता येईल.
बदलती जीवनशैली, चुकीची आहारपद्धती यामुळे अनेकजण शारीरिक समस्यांमुळे त्रस्त आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनात काही लहानसहान नियम नियमित फॉलो केले तर नक्कीच प्रत्येकाला हेल्दी लाइफ जगता येईल.
पचायला जड असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं टाळा. त्याऐवजी हलका आहार, सूप यांचा आहारात समावेश करा.
सात्विक अन्नाचं सेवन करा. तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ शक्य होईल तितके टाळा.
दिवसभरात मुबलक पाण्याचं सेवन करा. तसंच जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका.
शक्य होईल तितकं आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करा. यामुळे पचनक्रिया सुधारते.
सूर्यास्तानंतर पचनशक्ती मंदावते. त्यामुळे संध्याकाळचे जेवण लवकर घेणे आवश्यक आहे. उशिरा जेवल्याने अन्न पचण्यास अडथळा येतो आणि अॅसिडिटी व अपचनाच्या समस्या वाढतात.