सोनं-चांदी झाली आणखीन स्वस्त; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार?

आजही सोने आणि चांदीच्या किमतीत बदल दिसून येत आहे. खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट.

आजही सोने आणि चांदीच्या किमतीत बदल दिसून येत आहे. बुधवार, १६ जुलै रोजी सराफा बाजारात चांदीचा भाव १००१ रुपयांनी कमी होऊन ११०९९६ रुपयांवर आला. 

सोन्याच्या किमतीत ४५६ रुपयांची घसरण झाली. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १००३८३ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जातंय, तर चांदी ११४३२५ रुपये प्रति किलो दराने विकली जातेय.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोने देखील ४५४ रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९७०७० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता ९९९८२ रुपये आहे.

दागिन्यांच्या जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झालं तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९२७३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह ती ९१९५१ रुपये झाली. 

१८ कॅरेट सोन्याची किंमत ३४२ रुपयांनी कमी होऊन ७३०९५ रुपये झाली आहे आणि जीएसटीसह ती ७५२८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. यात मेकिंग चार्जेस नाहीत.

एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?

Click Here