ताऱ्यांमधून साेनं आलं पृथ्वीवर !

साेन्याचे दागिने महिलांचा आवडता विषय. पण, हे साेनं पृथ्वीवर आलं कसं? हे तुम्हाला माहिती आहे का?

पृथ्वीवर माेठ्या प्रमाणात साेन्याचा वापर केला जाताे. मुळात साेनं हे पृथ्वीवरचे नाही, असं सांगितल तर विश्वास बसेल का?

हे खरं आहे, साेनं पृथ्वीवर आलं आहे. मुळात ते पृथ्वीवर नव्हते. साेनं पृथ्वीवर कसे आले, हे जाणू घेऊ या.

वैज्ञानिक सांगतात, पृथ्वी तयार झालं तेव्हा साेनं नव्हत. आकाशातून साेनं पृथ्वीवर आले आहे. 

अब्जावधी वर्षांपूर्वी, पृथ्वी निर्माण होत असताना सतत उल्का (Asteroids) आपटत होत्या. त्या उल्कांमध्ये सोनं आणि इतर धातू होते.

सोन्याचा खरा उगम आणखी खोल आहे. ताऱ्यांचा मृत्यूमधून साेन्याचा उगम झाला आहे, असे म्हणतात. 

जेव्हा प्रचंड माेठे तारे तुटून Supernova होतात, तेव्हा त्यातील उर्जा अणुंना एकत्र करून सोन्यासारखा जड धातू तयार करते.

तसेच दोन  Neutron Stars जेव्हा एकमेकांना धडकतात, तेव्हा ही प्रचंड प्रमाणात सोनं तयार होतं आणि अवकाशात पसरतं.

पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात अवकाशातील धुळीच्या कणांपैकी थोडा भाग म्हणजेच साेनं पृथ्वीवर येऊन जमिनीखाली साठून राहिला. 

पृथ्वीवरचं सोनं हे खरं तर 'ताऱ्यांचा वारस' आहे. प्रत्येक दागिन्यात थोडासा ताऱ्यांचा तुकडा दडलेला असतो.

जगभरात सापडलेलं सोनं हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी वरच्या थरात आहे. खोल पृथ्वीच्या गर्भात अजून किती सोनं दडलंय, याचा अंदाजही लावता येत नाही.

Click Here