फक्त लिकेजच नाही तर या कारणांमुळेही होऊ शकतो सिलेंडरचा ब्लास्ट
गोव्यामध्ये अलिकडेच एका नाइट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन जवळपास २५ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले.
सिलेंडरचा स्फोट हा लीक लिक झाल्यावर होतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, अन्यही काही कारणांमुळे सिलेंडरचा स्फोट होतो. ही कारणं कोणती ते जाणून घेऊयात.
सिलेंडर लीक झाला असेल तर तो पेट घेण्यासाठी छोटीशी ठिणगीही पुरेशी असते. सिलेंडर लीक झाल्यावर त्यातला गॅस कमी होतो. ज्यामुळे गॅसचं प्रेशर कमी होतं आणि आग सिलेंडरला लवकर लागते व तो पेट घेतो.
सिलेंडर खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करुन घेण्याचा सल्ला कायम दिला जातो. कारण, जर सिलेंडर एक्सपायर झाला तरीदेखील त्याचा स्फोट होतो.
जर तुम्ही सिलेंडर चुकीच्या पद्धतीने ठेवला असेल तर तोदेखील घातक आहे. सिलेंडर ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता तेथील जागा मोकळी हवी. तसंच सिलेंडर कधीही आडवा ठेऊ नका. तो कायम उभाच ठेवा.
सिलेंडरच्या वॉल्वमध्ये प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याचा स्फोट होऊ शकतो.
सिलेंडरवर कधीही थेट सुर्यप्रकाश किंवा उष्णता निर्माण होईल अशा वस्तू ठेऊ नका. कारण, उष्ण वातावरणामुळे सिलेंडरमधील गॅसवर प्रेशर येतं व तो गॅस बाहेर पडायचा प्रयत्न करतो. ज्यामुळे स्फोट होतो.