काच ही घन की द्रव?

आपण नेहमी वापरतो ती काच नेमकी द्रव आहे की घन? या प्रश्नावर शास्त्रज्ञांमध्ये खूप चर्चा झाली आहे. 

लोक म्हणतात, जुन्या चर्चच्या खिडक्या खालून जाड असतात, म्हणून काच हळूहळू खाली वाहते, पण नक्की खरं काय?

काच ही अमोर्फस सॉलिड (Amorphous Solid) आहे. काचेत घनासारखा कडकपणा आहे, पण अणूंची रचना द्रवासारखी विस्कटलेली असते.

काच अजिबात वाहत नाही. जुन्या खिडक्या जाड- पातळ असण्याचं कारण म्हणजे तेव्हा काच तयार करण्याची पद्धत अपूर्ण होती.

धातू किंवा क्रिस्टलमध्ये अणू नियमित रचनेत असतात. पण काचेमध्ये ते अनियमित पद्धतीने असतात, म्हणून ती ना पूर्ण घन, ना द्रव.

काच उच्च तापमानावर गरम केल्यावर मऊ होते आणि शेवटी वितळते. म्हणूनच ती शुद्ध द्रव नाही.

आज शास्त्रज्ञ काचेला Supercooled Liquid किंवा Amorphous Solid म्हणतात.दोन्हींचं मिश्रण असते.

पूर्वीच्या काच कारागिरांनी बनवलेली पत्रकं परिपूर्ण नसत. बसवताना त्यांनी जाड भाग खालच्या बाजूला ठेवला, म्हणून ती तशी दिसतात.

काच याच अनोखी गुणधर्मामुळे आरसे, मोबाईल स्क्रीन, फायबर ऑप्टिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानात वापरली जाते.

Click Here