Girlfriend शब्द पहिल्यांदा कधी वापरला?

आजकाल सर्रासपणे वापरला जाणाऱ्या 'गर्लफ्रेंड' या शब्दामागे शेकडाे वर्षांचा इतिहास आहे. हा शब्द आधी केव्हा वापरला, काेणत्या अर्थाने वापरला, हे माहिती आहे का?

Girlfriend हा शब्द इंग्रजी भाषेतल्या Girl आणि friend या दाेन शब्दांपासून तयार झाला आहे. हे २ शब्द एकत्र आल्यावर त्याचा अर्थ वेगळा हाेताे. 

जुन्या इंग्रजीमध्ये Girl हा शब्द तरूण व्यक्ती या अर्थाने मुलगा किंवा मुलीसाठी वापरला जात हाेता. 

 Girlfriend हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन इंग्रजीमध्ये १८६३ साली लिहीलेल्या मजकूरात पहिल्यांदा लिहीला असल्याची नाेंद आहे. 

पूर्वीच्या काळी हा शब्द राेमॅटिक अर्थाने वापरला जात नसे. आधी महिला मित्र किंवा ओळखीची महिला या साध्या अर्थाने ताे वापरला जायच. 

१९२० नंतरच्या काळात पाश्चिमात्य समाजांमध्ये प्रेम संबंधांविषयी खुले पणाने बाेलले जाऊ लागले, त्या काळात या शब्दाला प्रेमिका असा अर्थ जाेडला गेला. 

१९३० ते १९४० या दशकात मासिके, रेडिओ, चित्रपटात Girlfriend हा शब्द प्रेमसंबंधात वापरला गेला. तेव्हापासून रूढ अर्थ या शब्दाशी जाेडला गेला. 

१९५० नंतर बदलणाऱ्या समाजात Girlfriend शब्दाला प्रेमिका या अर्थाने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सर्रासपणे हा शब्द प्रचलित झाला. 

Girlfriend या शब्दाचा मैत्री ते प्रेम हा प्रवास असा हाेत गेला. Girlfriend शब्दाने १६० वर्षांचा हा प्रवास केला आहे. 

Click Here