कोणत्याही गोष्टीचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे.
आलं घातलेला चहा आवडत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती असेल.
पाऊस पडला की मस्त आलं घालून केलेला वाफाळता चहा पिण्याची मज्जा काही औरच असते.
आलं घालून चहा पिण्याचे काही फायदे आहेत. तसेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. ते कोणते हे पाहुयात.
आलं घालून चहा प्यायल्यानंतर ब्लडप्रेशर लो होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना मुळातच लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी आल्याचा चहा टाळावा.
आलं उष्ण प्रवृत्तीचं आहे. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांनी मर्यादित प्रमाणात आल्याचा चहा घ्यावा.
आल्याचा चहा घेतल्यामुळे रक्त पातळ होतं. त्यामुळे ज्यांनी मुळातच रक्त पातळ असण्याची समस्या आहे. त्यांनी हा चहा पितांना काळजी घ्यावी.
प्रमाणापेक्षा जास्त चहा घेतला तर अॅसिडीटी, छातीत जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात.