प्रत्येक पदार्थ सगळ्यांसाठी फायदेशीरच असेल असं नाही. काही विशिष्ट आरोग्यस्थितींमध्ये साजूक तूप खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी त्रास वाढू शकतो.
अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे साजूक तुपाला “सुपरफूड” म्हटलं जातं.
तूप आहारात समाविष्ट करण्यापूर्वी “आपण ते खावं की नाही?” याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे.
नेमकं साजूक तूप कुणी खाऊ नये आणि कोणी मर्यादित प्रमाणात घ्यावं, ते पाहूयात.
फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस यांसारख्या समस्या आहेत, त्यांनी साजूक तूप खाणे टाळावे. तुपामुळे यकृतावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल किंवा हृदयाशी संबंधित आजार असतील, तर तूप रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करू शकते.
वेटलॉस करणाऱ्यांनी तुपाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. तुपात कॅलरीज आणि फॅट्स जास्त असल्याने वजन वेगाने वाढू शकते.
अपचन, गॅस किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी तूप खाताना काळजी घ्यावी. काहीवेळा तूप पचायला जड असल्याने पोटाच्या तक्रारी वाढू शकतात.
गरोदरपणात तूप फायदेशीर असले तरी, जर वजन खूप जास्त वाढत असेल किंवा बीपीचा त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तूप खाऊ नये.
तूप पूर्णपणे बंद न करता, आपल्या प्रकृतीनुसार मर्यादित प्रमाणात घ्या.