चुकूनही तुपासोबत या ४ गोष्टी खाऊ नका, होतील भयंकर परिणाम 

तूप हे केवळ भारतीय जेवणाचाच भाग नाही तर संस्कृतीचाही भाग आहे. 

तूप हे केवळ भारतीय जेवणाचाच भाग नाही तर संस्कृतीचाही भाग आहे. अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त, ते आरोग्यदायी देखील आहे.

तूपामध्ये गुड फॅट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी सारखे चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात.

तज्ज्ञांच्या मते, दररोजच्या आहारात एक किंवा दोन चमचे तूप समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते. 

परंतु प्रत्येक गोष्टीत तूप घालून खाणे हानीकारक ठरू शकते. काही गोष्टी तुपासोबत खाल्यानं फायदा नाही तर मोठा तोटा होतो. 

तूप आणि मध दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्र खाणे तोट्याचे ठरू शकते. 

आयुर्वेदाप्रमाणे तूप अन् मध समप्रमणात मिसळून खाल्ले तर पचनक्रिया बिघडू शकते आणि शरीरात विषारी पदार्थ वाढण्याचा धोका निर्माण होतो. 

तूप हे तेलकट अन् उष्ण असतं. तर दही थंड आणि पचायला जड असतं. या दोन्हीचे मिश्रण तुमची पचनसंस्था बिघडू शकते. यामुळं पोट फुगीचा त्रास होऊ शकतो. 

संत्री, लिंबू आणि आवळा यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे आम्लयुक्त स्वरूप तुपासोबत एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत बिघडू शकते.

याचबरोबर मुळा आणि तूप एकत्र खाणं देखील हानीकारक ठरू शकतं. या दोन्हीचे गुणधर्म हे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. 

Click Here