आता कबुतर चुकूनही येणार नाही घरात!

कबुतरांनी आतंक माजवलाय? त्यांच्यासमोर ठेवा ही गोष्ट

सध्या कबुतरांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आहे. कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजाराविषयी सगळ्यांनाच माहित आहे.

शहरांमध्ये खासकरुन उंच इमारतींमध्ये कबुतरांची समस्या वारंवार जाणवत असते. अनेकदा हे कबुतर खिडकीत, बाल्कनीत येऊन प्रचंड घाण करतात. 

जर तुम्ही सुद्धा कबुतरांच्या उच्छादाला कंटाळला असाल तर त्यांना पळवून लावायच्या काही ट्रिक्स पाहुयात.

घराच्या ज्या खिडकीत किंवा बाल्कनीत कबुतर येतात. त्याठिकाणी काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवा.

वाऱ्यासोबत ज्यावेळीही पिशवी हलते त्यावेळी कबुतरांना ती शिकारी जनावर असल्याचा भास होतो आणि ते तिच्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतात. 

पिशवी लावल्यामुळे घराची शोभा कमी होतीये असं वाटत असेल तर तुम्ही त्याऐवजी विंडचाइम सुद्धा लावू शकता. याच्या आवाजामुळे सुद्धा कबुतर पळून जातात.

मुलांची ग्रोथ होण्यासाठी झटपट होणारे नाश्त्याचे प्रकार

Click Here