चातुर्मासात दिलेले स्तोत्र रोज म्हटले किंवा नुसते एकदा ऐकले तरी होणारे लाभ वाचून थक्क व्हाल!
यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरु होत असून २ नोव्हेम्बर रोजी कार्तिकी एकादशीला त्याची सांगता होणार आहे.
चातुर्मासात विष्णू उपासनेचा संकल्प म्हणून अनेक जण अनेक प्रकारचे उपाय करतात. इथे देत असलेला उपाय सर्वात प्रभावी आहे.
चातुर्मासात करा विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण; त्यासाठी द्यावी लागतील रोज फक्त २० मिनिटं, पण लाभ होईल आयुष्यभर!
या स्तोत्राच्या नित्यपठणाने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो.
गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात.
ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.
मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो.
हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.