जिनिलिया-रितेशच्या सुखी संसाराचं रहस्य काय?

काहीही झालं तरी या गोष्ट कधीच करू नका!

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. 

या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची लव्हस्टोरी फारच भारी आहे.

रितेश आणि जिनिलिया यांची प्रेमकहाणी २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सुरू झाली. 

 जवळपास १० वर्षे डेट केल्यानंतर ते ३ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांनी लग्न केले. 

आज दोघेही दोन मुलांचे पालक असून, अनेक जोडप्यांसाठी 'couple goals' ठरले आहेत. 

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. लग्न झाल्यानंतरही या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे. त्याचमुळे या दोघांची जोडी अनेकांना आवडते.

दोघांच्या या सुखी संसाराचं रहस्य एका मुलाखतीत रितेशने सांगितले होतं. 

तो म्हणाला होता, "प्रत्येकानेच नात्यामध्ये समजूतदारपणे वागावं. सुसंवाद साधणे गरजेचेच असते. प्रत्येक नात्यामध्ये मत मांडण्याचा अधिकार दोघांनाही असतो".

रितेशने सांगितले, "भांडण प्रत्येक कपलमध्ये होतेच. मात्र ते किती लांबवायचे हे आपल्याला समजले पाहिजे. भांडण झाल्यावर मनापासून माफी मागा. आजचे भांडण कधीच उद्यावर न्यायचे नाही".

Click Here