Gen-Z म्हणजे नेमके काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? जाणून घ्या.
Gen-Z ही एक पिढी आहे, तिला जनरेशन झेड असे म्हटले जाते.
ज्या लोकांचा जन्म १९९७ ते २०१२ दरम्यान झाला आहे, त्यांना Gen-Z असे म्हणतात.
या पिढीतील लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय राहतात.
GEN-Z ही पहिली पिढी आहे, जी जन्मापासूनच इंटरनेट, सोशल मीडिया आणि मोबाईल तंत्रज्ञानाने वेढलेली आहे.
हे लोक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांबाबत अत्यंत जागरूक आहेत. ते पर्यावरण, सामाजिक न्याय, समानता आणि मानवाधिकार यांसारख्या विषयांवर आपले मत मांडतात.
मागील पिढ्यांच्या तुलनेत हे लोक अधिक वास्तववादी आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक आहेत.
GEN-Z पिढी स्वतःच्या पायावर उभे राहून लवकर करिअर सुरू करण्यास प्राधान्य देतात.
त्यांचे बहुतांश व्यवहार, संवाद आणि मनोरंजन हे स्मार्टफोनवरच अवलंबून असते.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टिकटॉक, आणि यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मचा ते मोठ्या प्रमाणात वापर करतात.