आजच्या युगात बहुतांश बोलणे हे आता मेसेजवर होत आहे.
परंतू एखाद्याला मेसेज पाठवला की त्याच्या मागचा टोन समजत नाही. यामुळे सोबत एक इमोजी जोडणे गरजेचे असते.
तुम्हीही हे करत असाल. परंतू, तो इमोजी पाठविताना तुम्ही चुकून हे इमोजी तर पाठवत नाहीय ना...
कारण तुमच्या ईमोजीच्या लिस्टमध्ये गे आणि लेस्बिअनचेही इमोजी भरभरून आहेत.
चुकून तुम्ही चुकीचा ईमोजी एखाद्याला पाठवला तर त्याला भलतेच वाटेल आणि उगाच गैरसमज पण होऊ शकतात.
किंवा एखाद्याने तुम्हाला तसा इमोजी पाठविला, तुम्ही त्याला अज्ञानातून होकार दिला तरीदेखील नसती ब्याद मागे लागू शकते.
मेसेजिंग अॅपमध्ये तुम्ही तुमच्या कीवर्डनुसार इमोजी शोधू शकता. यामध्ये मूड, फिलिंग, अॅक्टीव्हीटी, नेचरनुसार तुम्ही निवडू शकता.
यासाठी तुम्हाला हॅप्पी, सॅड, अमेझ्ड, फेस्टीव्ह सारखे अनेक कीवर्ड आहेत, ते तुम्ही वापरू शकता.
या सर्व इमोजीमध्ये गे आणि लेस्बिअन देखील इमोजी आहे, जे या कीवर्डला जोडलेले आहेत. चुकून तुम्ही ते कधी कोणाला पाठवू नका...