फंगल इंफेक्शन ही सध्या कॉमन समस्या झाली आहे.
वातावरणातील आर्द्रतेमुळे सध्याच्या काळात अनेक जण फंगल इंफेक्शनच्या समस्येने त्रस्त आहेत.
आज असे काही घरगुती उपाय पाहुयात ज्यामुळे फंगल इंफेक्शनची समस्या काही प्रमाणात कमी होईल.
कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या अँटी फंगल आणि अँटी बॅक्टरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे फंगल इंफेक्शनची समस्या दूर होते.
दररोज अंघोळ करतांना अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची काही पाने टाका. ज्यामुळे फंगलचा त्रास कमी होईल.
शरीराच्या ज्या भागावर जास्त घाम येतो तिथे बेकिंग सोडा हलक्या हाताने लावा. ज्यामुळे घाम येणार नाही. व फंगल इंफेक्शन प्रादुर्भाव थांबेल.
ज्या ठिकाणी फंगल इफेक्शन झालं आहे त्याठिकाणी कापसाच्या बोळ्यावर व्हिनेगर घेऊन ते लावा. ज्यामुळे स्कीनचा पीएच बॅलेन्स होतो. व, समस्या दूर होते.
कोरफड रस आणि हळद मिक्स करुन हा लेप सुद्धा तुम्ही फंगल इंफेक्शन झालेल्या ठिकाणी लावू शकता.