रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नयेत 'ही' फळे!

अशी काही फळे आहेत, जी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्रास वाढवू शकतात.

फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात आणि सकाळच्या आहारात त्यांचा समावेश करणे चांगले मानले जाते.

दिवसाची सुरुवात फळांनी केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि ऊर्जा टिकून राहते.

पण अशी काही फळे आहेत, जी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्रास वाढवू शकतात, चला जाणून घेऊया.

संत्री, लिंबू, द्राक्षे यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

कारण लिंबूवर्गीय फळांमध्ये आम्ल असते. रिकाम्या पोटी ही फळे खाल्ल्यास जळजळ आणि आम्लपित्त वाढवते.

याशिवाय, रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने पोटात अस्वस्थता, उलट्या आणि पोटात गॅस होऊ शकतो.

रिकाम्या पोटी अननसही खाऊ नये, कारण त्यात आम्लधर्मी गुणधर्म असतात आणि ते पचनक्रिया बिघडवू शकतात.

याव्यतिरिक्त, रिकाम्या पोटी आंबे खाल्ल्याने पोट फुगू शकते आणि त्यातील उच्च फायबरच्या प्रमाणामुळे पोटात पेटके येऊ शकतात.

रिकाम्या पोटी कलिंगडही खाऊ नये. त्यामुळे पोटातील आम्लाचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.

Click Here