आयुष्यात अनेक नाती खूप सुंदर असतात. तसंच एक नातं आहे ते मैत्रीचं नातं. हे नातं कसं टिकवता येत माहिती आहे का?
मैत्रीच्या नात्याला वयाचं, अंतराचं असं कसलही बंधन नसतं. हे रक्ताचं नातं नसूनही प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाच असतं.
आयुष्यात खरे मित्र मिळणे हे भाग्यच समजले जाते. मित्र खूप मिळू शकतात. पण, खरे मित्र मिळणे कठीण असते.
तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांना कधी दुखवायचे नसेल, त्यांच्यापासून दूर जायचे नसेल, तर काही खास गाेष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.
तुमच्या मैत्रीमध्ये तिसऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊ नका. त्या तिसऱ्या व्यक्तीवर जास्त विश्वास टाकणे धाेकादायक ठरू शकते.
तुमच्या मित्राला इतर काेणासमाेर ही कमी लेखू नका. त्याला कमीपणा येईल असे बाेलणे टाळा. तुम्ही दाेघच असताना या विषयांवर बाेला.
तुमच्या मध्ये मतभेद झाले, तरी ते त्या विषयापुरते मर्यादित ठेवा. त्या विषयांमुळे बाेलणे टाळू नका.
तुमच्या मित्राने तुम्हाला कधीही तुमच्या बाबत न पटणारी गाेष्ट सांगितली, टीका केली तर त्यावर गांभीर्याने विचार करा.
तुमचा मित्र - मैत्रिण दुखावली जाईल अशा गाेष्टी तुम्ही बाेलणे टाळले पाहिजे. चुकूनही या गाेष्टी तुम्ही बाेलू नका.
तुमच्या मित्रांना गृहित धरू नका. त्यांना याेग्य ते महत्त्व द्या. त्यांच्याशी नेहमी संवाद साधत रहा.
तुमच्याकडून काही चूक झाली, तर मित्राची माफी मागायला कमीपणा मानू नका. लगेच माफी मागा.