अन्न टिकण्यासाठी सर्रास फ्रीजचा वापर हाेताे. अन्न खराब हाेऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवताे. पण, हे पदार्थ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये.
बटाटे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये बटाट्यातील स्टार्च कमी हाेताे आणि त्याची शिजवल्यावर चव बिघडते. उकडलेले बटाटे ठेवू शकता.
फ्रीजमधील ओलसरपणामुळे कांद्याला बुरशी येते. त्यामुळे ते कुजतात. कांदा कापून ठेवल्यास वास येताे, अन्य अन्नपदार्थांची चव बदलते.
फ्रीज थंड असल्यामुळे लसूण मऊ पडताे. त्याची चव बदलते. लसूण काेरड्या, जास्त सूर्यप्रकाश न येणाऱ्या जागेत ठेवावा. त्याच्यातील औषधी गुण टिकून राहतात.
ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास पटकन काेरडा हाेता, त्याची चवही बदलते. त्यामुळे ब्रेड खाेलीच्या तापमानात बंद पिशवीत ठेवल्यास चांगला टिकताे.
मध नैसर्गिकरित्या सामान्य तापमानात टिकताे. फ्रीजमध्ये ठेवल्याने स्फटिकासारखा घट्ट हाेताे. घट्ट झाल्याने वापरण्यास त्रास हाेताे.
टाॅमेटाे फ्रीजमध्ये ठेवल्याने टाॅमेटाेच्या पेशींचे नुकसान हाेते. टाॅमेटाेची चव कमी हाेते. सामान्य तापमानात टाॅमेटाे चांगले राहू शकतात.
केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास काळी पडतात. आतून मऊ पडतात. केळी सामान्य तापमानात चांगली राहतात आणि पिकतातही.
फ्रीजच्या ओलसर वातावरणात काॅफीचा सुंगध आणि चवही कमी हाेते. काॅफी हवा बंद डब्यात थंड पण काेरड्या ठिकाणी ठेवावी.