वारंवार तोंडात फोड येतायेत? ही आहेत त्यामागची कारणे

जर तुमच्या तोंडात वारंवार फोड येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. 

बऱ्याचदा शरीरातील उष्णता वाढली की तोंडात फोड येतात किंवा अल्सरचा त्रास होतो. परंतु, तोंडात वारंवार फोड येत असतील तर त्यामागे अन्यही काही कारण असू शकतात.

जर तुमच्या तोंडात वारंवार फोड येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. अनेकदा चुकीच्या आहारपद्धती आणि जीवनशैलीमुळेदेखील तोंडात फोड येतात.

तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्यासही फोड येऊ शकतात.

दीर्घकाळापासून अँटीबायोटिक औषधांचे सेवन केल्यामुळे तोंड येऊ शकतं.

मानसिक ताण, अपुरी झोप, कमी रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा तोंड येण्यामागची कारणं आहेत.

वारंवार टुथपेस्ट बदलल्यामुळेही तोंड येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

कधी कधी काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीदेखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.

दररोज किती पाणी प्यायला हवं? जाणून घ्या

Click Here