आधी पॉर्न स्टार, आता बनले मंत्री; कोणते खाते मिळाले?

दोन एक्स पॉर्न स्टारची राष्ट्राध्यक्षांनी का केली निवड?

अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या, पॉर्न स्टार असलेल्या व्यक्तींना मंत्री बनवले तर काय होईल?

आपल्याकडे तसं होण्याची शक्यता नाही. पण, हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे एका देशात तसं घडलं आहे; तो देश आहे कोलंबिया!

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्र्रो यांनी २०२२ मध्ये एक नवीन मंत्रालय सुरू केले होते. या खात्याला कॅबिनेट मंत्री आहे आणि दोन राज्यमंत्री. हे दोन्ही राज्यमंत्रीच एक्स पॉर्न स्टार आहेत.

राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ज्या दोन एक्स पॉर्न स्टार व्यक्तींची मंत्रिमंडळात निवड केली आहे, त्यांची नावे आहेत अलेजांद्रा उमाना आणि ज्युआन कार्लोस फ्लोरियन.

अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या अलेजांद्रा उमानाचे पहिले नाव अमरांता हंक होते. तिने पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पत्रकार म्हणून कामही केले. पण नंतर ती पॉर्न स्टार बनली. 

ज्युआन कार्लोस फ्लोरियन याने २०२५ मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. अलेजांद्रा पेट्रो आणि ज्युआन यांच्याकडे समानता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आर्थिक दुर्बल घटक, महिला, कृष्णीवर्णीय समुदाय, एलजीबीटीक्यू समुदाय आणि इतर मागास घटकांना मदत मिळावी आणि सुधारणा करण्यासाठी हे मंत्रालय सुरू केलं.

अलेजांद्रा उमाना आणि ज्युआन कार्लोस फ्लोरियन यांना मंत्रिमंडळात घेण्याला काही नापसंती दर्शवली. पण, दोघेही आता अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत नाहीत.

 दोघेही समान हक्क, समान वागणूक हे विषय घेऊन सामाजिक कार्य करताहेत. त्यांना सार्वजनिक पदावर काम करण्याचा अधिकार असल्याचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी म्हटलं आहे.

बॅकग्राउंड डान्सर आता गाजवतेय बॉलिवूड !

Click Here