लाईफस्टाईल, माेबाईल, कामाचा ताण अशा अनेक कारणांमुळे अनेकांची झाेप उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण हाेत असेल, तर आता तुम्ही निश्चिंत झाेपा.
रात्री माेबाईल स्क्राेल करण्यात किंवा सिरीज पाहण्यात रात्रीचे १२ वाजतात, ते कळंतच नाही. असं तुमच्या बाबतीत झालं असेल, तर वेळीच ही सवय बदला.
रात्री वेळच्या वेळी झाेपायचे असेल, तर पूर्वीप्रमाणे जरा लाईफस्टाईल पुन्हा एकदा सेट करा, आणि बघा काही दिवसातच तुमच्या झाेपेच गणित बसेल.
रात्री झाेपायची आणि सकाळी उठण्याची एक वेळ फिक्स करा. यामुळे तुमचे बाॅडी क्लाॅक पण सेट हाेईल आणि तुम्हाला चांगली झाेप लागेल.
दिवसभरात २० ते ३० मिनिटे व्यायाम करा. पण, झाेपण्याच्या आधी २ ते ३ तास व्यायाम करू नका.
रात्रीचे जेवण हलके घ्या. रात्रीचे जेवण आणि झाेपण्याच्या वेळेत कमीत कमी २ तासांचा वेळ राहू द्या.
झाेपण्याच्या आधी एक तास स्क्रीन टाईम टाळा. माेबाईल, लॅपटाॅप, टीव्ही बघू नका. यामुळे ब्रेन ऍक्टिव्ह हाेणार नाही, शांत झाेप लागण्यास मदत हाेईल.
रात्री झाेपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघाेळ करा. यामुळे शरीराला आराम मिळताे. लवकर झाेप लागण्यास मदत हाेते.
झाेपताना टेन्शन, चिंता वाढवणाऱ्या विषयांवर चर्चा करू नका, त्या गाेष्टींचा अधिक विचार करू नका. पाॅझिटिव्ह विचार करा.
रात्री झाेपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय लावा. पुस्तक वाचल्याने चांगली, शांत झाेप लागण्यास मदत हाेते.
झाेपण्यापूर्वी मेडिटेशन करा. मांडी घालून नुसते डाेळे मिटून २ मिनिटं शांत बसा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा हाेईल.