हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

हिवाळ्यात कोणते पदार्थ टाळले पाहिजेत ते पाहुयात.

ऋतू बदलला की त्यानुसार आपला आहारविहारदेखील बदलायचा असतो. तरच त्या ऋतुमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहतं.

साधारणपणे कोणत्या ऋतुमध्ये काय खावं हे प्रत्येकजण सांगतच असतो. परंतु, हिवाळ्यात कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हे पाहुयात.

हिवाळ्यात शीतपेय, आइस्क्रीम यांसारखे पदार्थ टाळले पाहिजेत. या थंड पदार्थांमुळे  घशात खवखव होणे, घसा दुखणे या समस्या उद्भवतात.

हिवाळ्यात मुळातच आपली पचनशक्ती मंदावली असते. त्यामुळे या दिवसांमध्ये तेलकट पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ पचायला जड असतात. ज्यामुळे मग पोटदुखीसारखी समस्या होते.

गारवा वाढला की सहाजिकच आपण चहा, कॉफीचा आस्वाद घेतो. परंतु, या दिवसात कॅफेनयुक्त पदार्थ टाळावेत. कॅफेन शरीरातील पाणी शोषून घेतं. ज्यामुळे डिहायड्रेशन, त्वचा कोरडी पडणे या समस्या होतात.

ऊसाच्या रसामुळे दूर होतील अनेक शारीरिक समस्या

Click Here