कॉफीचा आनंद घेताना काही पदार्थ टाळणं आवश्यक आहे, कॉफीसोबत कोणते ५ पदार्थ खाऊ नयेत.
कॉफीची चव वाढवण्यासाठी सोबत काही स्नॅक्स किंवा पदार्थ घेतो, परंतु कॉफीसोबत ठराविक पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी, पचनाचे विकार आणि पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा निर्माण होऊ शकतो.
संत्री, लिंबू किंवा द्राक्षे यांसारखी आंबट फळे कॉफीसोबत खाल्ल्याने पचनात अडथळा येतो आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
अनेकांना कॉफीसोबत चीज किंवा जास्त क्रीम असलेले पदार्थ आवडतात. मात्र, कॉफीमधील कॅफीन शरीरातील कॅल्शियम शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते.
लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ घेत असाल, तर त्यानंतर लगेच कॉफी पिणे टाळा. कॉफीमधील 'टॅनिन' लोहाचे शोषण रोखते.
भजी किंवा समोसे यांसारखे तेलकट पदार्थ कॉफीसोबत खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
कॉफी आणि हेव्ही डेअरी पदार्थ एकत्र घेतल्यास पचन मंदावते आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
बर्गर, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स हे पदार्थ पोषणमूल्य कमी आणि मीठ जास्त असलेले असतात. कॉफीसोबत घेतल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
कॉफी आणि इतर पदार्थ खाण्यामध्ये किमान ४५ मिनिटांचे अंतर ठेवावे, जेणेकरून शरीराला अन्नातील पोषक तत्वे व्यवस्थित मिळतील.