बऱ्याचदा पनीर फ्रीजमध्ये ठेवलं की ते कडक होऊन जातं. ज्यामुळे त्याची मूळ चव बिघडते.
पनीर कडक झाल्यामुळे ते एकतर रबरासारखं लागतं. इतकंच नाही तर भाजीमध्ये घातल्यानंतरही ते बेचव लागतं. म्हणूनच, फ्रीजमधलं पनीर बाहेर काढल्यानंतर सॉफ्ट कसं करायचं ते पाहुयात.
पनीर फ्रीजमध्ये ठेवतांना कायम पाण्यात ठेवा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये पनीर ठेवा. यावेळी पाणी पनीरच्या वर येऊ द्या. नाही तर पनीरची वरची कडा कडक होईल.
पनीरचा कोणताही पदार्थ तयार करण्यापूर्वी साधारणपणे २ ते ३ तास आधीच पनीर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावं. ज्यामुळे ते रुम टेम्परेचरवर येतं.
जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पनीरचे लहान-लहान तुकडे करुन ते कोमट पाण्यात १५-२० मिनिटे भजवून ठेवा. यामुळे ते सॉफ्ट होतील.
पनीर फ्रीजच्या बाहेर जर ठेवायचं असेल तर ते फार काळ पाण्यात ठेवू नका. यामुळे ते भुसभुशीत होऊन त्याचे तुकडे पडू शकतात.
एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यावर चाळणी ठेवावी. या चाळणीत पनीरचे तुकडे ठेवावेत. व, ते झाकूण ध्यावे. यामुळे पनीर गरम वाफेमुळे सॉफ्ट होतात.