६१००० पेन्शन हवी? मग १५-५-५ सूत्र वापरा

१५-५-५ सूत्रानुसार, तुम्ही २५ वर्षात १.०३ कोटींचा निधी तयार करू शकता. 

जर तुम्हाला निवृत्तीसाठी स्मार्ट फंड तयार करायचा असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. 

पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याच्या १५-५-५ सूत्रानुसार, तुम्ही २५ वर्षात १.०३ कोटींचा निधी तयार करू शकता. 

या रकमेवर मिळणाऱ्या व्याजानं तुम्ही दरमहा ६१ हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकता. पीपीएफ ही सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित गुंतवणूक योजनांपैकी एक आहे.

यातील गुंतवणुकीवर ७.१% व्याज मिळतं. ते दरवर्षी चक्रवाढ होतं, म्हणजेच तुमच्या पैशावर व्याज मिळतं आणि त्या व्याजावरही व्याज जोडलं जातं. मॅच्युरिटीवेळी रक्कम करमुक्त आहे.

१.५ लाख रुपये दरवर्षी गुंतवल्याने १५-५-५ सूत्र वापरून १.०३ कोटी आणि व्याजातून ६५ लाख रुपये मिळतील.

१५ वर्षे पीपीएफ योजनेचा मूळ कालावधी आहे. तेव्हा तुम्ही सर्व पैसे काढू शकता किंवा प्रत्येकी पाच वर्षाचे दोन वेळा विस्तार घेऊ शकता.

तुम्ही प्रत्येक महिन्याला १२ हजार ५०० रुपये गुंतविले तर १५ वर्षानंतर तुम्हाला ४०.६८ लाख रुपये मिळतील. 

२० वर्षांनंतर ६६.५८ लाख रुपये मिळतील. २५ वर्षांनंतर याच गुंतवणुकीवर तुम्हाला तब्बल १.०३ कोटी रुपये मिळतील.

Click Here