भाजी, आमटी खारट झाली? मग या ट्रीक्स वापरुन कमी करा अतिरिक्त मीठ

जर पदार्थात जरा जरी मीठ जास्त झालं तर मग सगळ्या पदार्थाची चव बदलून जाते.

जर एखाद्या पदार्थामध्ये तिखट, मीठ योग्य प्रमाणात झालं की तो पदार्थ नक्कीच चिविष्ट होतो. परंतु, जर पदार्थात जरा जरी मीठ जास्त झालं तर मग सगळ्या पदार्थाची चव बदलून जाते.

पदार्थामध्ये जर चुकून मीठ जास्त झालं असेल तर त्यातील अतिरिक्त मीठ कमी कसं करायचं याच्या काही टिप्स पाहुयात.

जर एखाद्या पदार्थात मीठ जास्त झालं तर टेन्शन घेऊ नका. चणाडाळीचं पीठ थोडंसं भाजून घ्या. आणि, हे भाजलेलं पीठ खारट झालेल्या पदार्थामध्ये टाका. यामुळे चव बॅलेन्स होईल.

भाजीत किंवा आमटीत मीठ जास्त झालं तर कणकेचा लहान गोळा करुन तो त्या पदार्थात टाका. काही वेळानंतर कणकेचा गोळा अलगद बाहेर काढा. हा गोळा पदार्थामधील अतिरिक्त मीठ शोषून घेतो.

लिंबाचा रस जर खारट पदार्थात घातला तर त्या पदार्थाचा खारटपणा कमी होतो.

साजूक तूप वापरुनही तुम्ही पदार्थाचा खारटपणा कमी करु शकता. यामुळे पदार्थामधील मीठ सुद्धा कमी होईल आणि चवदेखील वाढेल.

स्वयंपाक घरातल्या भांड्यांनाही असते एक्स्पायरी डेट

Click Here