रानभाज्यांचे औषधी गुणधर्म
कुरडूपित्तनाशक, त्वचाविकार आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते.
टाकळात्वचा विकारांवर तसेच पोटातील कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारांवरही ही भाजी उपयुक्त आहे.
दिंडारक्ताच्या वाढीसाठी पोषक, त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी, शरीरातील वात आणि कफदोष कमी करण्यास मदत करते.
भारंगीसर्दी, खोकला, ताप आणि छातीतील कफ कमी करण्यासाठी लाभदायक. श्वसनविकारांवर, दम्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.
रानभेंडीअशक्तपणा दूर करण्यास मदत व रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त. यात फायबर, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते.